कुही: डोंगरमौदा शिवारात मोहफुल दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Oct 20, 2025 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या डोंगरमौदा शिवारात अवैधरित्या मोहफुल दारू विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 4 लिटर मोहफुल दारु जप्त करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की वेलतुर पोलीसांचे पथक गस्तीवर असतांना गुप्त माहितीच्या आधारे डोंगरमौदा शिवारात दारु विक्री वर धाड टाकून आरोपीस ताब्यात घेऊन 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.