एरंडोल तालुक्यात हनुमंतखेडे सिम हे गाव आहे. या गावातील रहिवासी नेहा समाधान पवार वय २१ वर्षीय तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी एरंडोल शहरात नेटकॉम क्लासला जात आहे. असे सांगून घरून निघालेली तरुणी नंतर घरी परत आलीच नाही. तेव्हा या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.