महाराष्ट्रात गुटखा सुगंधी तंबाखू आणि मावा यांच्या विक्री साठवणूक आणि वितरणावर कायदेशीर बंदी असूनही सातारा जिल्ह्यामध्ये, अनेक ठिकाणी गुटख्याची खुल्या विक्री होताना दिसत आहे, ती एक मोठी चिंताजनक बाब असून, कायदेशीर बंदी असूनही लहान टपरी ते मोठ्या दुकानांपर्यंत अनेक ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होतो, व त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्यामुळे गुटखा बंदी असतानाही त्याची विक्री थांबत नाही, यासाठी योग्य ती भूमिका घ्यावी असे निवेदन देण्यात आले आहे.