रामटेक: तहसील कार्यालय रामटेक परिसरात 34 वर्षीय शेतमजूर परिवारासह उपोषणावर
Ramtek, Nagpur | Oct 9, 2025 देवलापार अंतर्गत लोधा शेतशिवारातील शेत सर्वे नंबर 263 वरील शासकीय कृषी जमिनीवर वडील 1994 पासून शेतवाहीजुपी करीत असून माझ्या परिवाराचे पालन पोषण करीत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून या जागेवर काही मंडळी डोळा ठेवून आहेत. मी वन हक्काचा दावा केला आहे मात्र तो प्रलंबित ठेवला जात आहे असा आरोप करीत तो दावा निकाली काढावा या मागणीसाठी गुरुवार दि. 9 ऑक्टोबरला सकाळी 11 वा. पासून तहसील कार्यालय रामटेक येथे लोधा येथील 34 वर्षीय गोविंद हिरेषी उईके हा पत्नी व लहान मुलगा मुलिसह उपोषणाला बसला आहे.