धुळे: चांदे फाट्यावर पोलिसांची धडक कारवाई! निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांचा साठा जप्त, बुलढाण्याचा संशयित जेरबंद!
Dhule, Dhule | Nov 1, 2025 धुळे तालुका पोलिसांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं यश मिळालं. गुप्त माहितीनुसार चांदे फाट्याजवळ सापळा रचून मोहम्मद जफर मोहम्मद कुड्स (वय ३०, बुलढाणा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २२,२०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त झाल्या. पाचशेच्या ४४ आणि शंभरच्या २ नोटांचा समावेश असून, या नोटांचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.