उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करून कारवाई करण्यात आली. स्थळपाहणी अहवालानुसार एकूण 34 बांधकामस्थळांवर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर प्रकल्पांचे काम तात्काळ थांबविण्यात आले आहे.