वर्धा: पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते शिवछत्र राजदंड कलश उभारुन शिवराज्यभिषेक साजरा
Wardha, Wardha | Jun 6, 2025 जिल्हा परिषदेच्या परिसरात आज शिवराज्यभिषेक दिनानिमित्त राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते शिवछत्र राजदंड कलशाची उभारणी करुन शिवराज्यभिषेक साजरा करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.