देवणी: पंचायत समिती परिसरात पिसाळलेल्या लांडग्याचा धुमाकूळ – सहा जणांवर हल्ला, दोन बालकांची प्रकृती चिंताजनक
Deoni, Latur | Nov 1, 2025 लातूर जिल्ह्यातील देवणी परिसरात पिसाळलेल्या लांडग्याचा धुमाकूळ – सहा जणांवर हल्ला, दोन बालकांची प्रकृती चिंताजनक देवणी पंचायत समिती परिसरात आज सकाळी पिसाळलेल्या लांडग्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. अल्पावधीतच लांडग्याने सहा जणांवर जीवघेणा हल्ला केला असून दोन बालकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये ईनाया इस्माईल मल्लेवाले (वय ३ वर्षे), फयजान फिरोज येरोळे (वय ९ वर्षे),