अर्जुनी मोरगाव: सिलेझरी येथे भागवत सप्ताहाचे आयोजन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती
आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सिलेझरी येथे भागवत सप्ताहाच्या निमित्ताने गोपाल काल्याच्या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिलेझरी येथे आयोजित भागवत सप्ताह कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद सदस्य रचना गहाने आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी मोठ्या संख्येत परिसरातील भाविक भक्तगण उपस्थित होते.