कर्जत: रायगड जिल्ह्यातील कर्जत गोळीबार प्रकरणातील आरोपीला पुण्यातून केली अटक
Karjat, Raigad | Nov 30, 2025 जमिनीच्या वादातून रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात गोळीबार करुन पसार झालेल्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. शिवाजीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. सिद्धार्थ प्रभाकर केंगार (२४, रा. हेल्थ कॅम्प, महापालिका वसाहत, पांडवनगर, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात १ ऑक्टोबर रोजी जमिनीच्या वादातून केंगार याने एकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. अशी माहिती आज रविवारी दुपारी १२ च्या सुमारास प्राप्त झाली.