नाशिकमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 कार्यक्रमाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील तरुणांनी अधिकाधिक संख्येने सैन्यात भरती व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात शहीद सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. यावेळी वीर पत्नी, वीरमाता आणि वीर परिवाराचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट 1 कोटी 55 लाख रुपये असताना या वर्षी तब्बल 2 कोटी 94 लाख रुपयांचे संकलन झाल्याची माहिती जिल्हा सैनिकांनी दिली.