नांदेड: धर्माबाद नगर पालिका निवडनुक प्रक्रिया रद्द मात्र प्रचार यंत्रणा अजूनही सुरू, मतदारासह उमेदवारही संभ्रमात
Nanded, Nanded | Nov 30, 2025 राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील मुखेड व धर्माबाद नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया ही अंतिम टप्प्यावर आली असता आजरोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अचानक रद्द केले असून याचा फटका उमेदवारासह मतदारांनाही बसला असून देखील आज धर्माबाद शहरात मात्र दिवसभर प्रचाराची वाहने गल्लोगल्ली फिरत असून संध्याकाळी 7 च्या सुमारास शिवसेना उबाठा पक्षाची प्रचार सभा देखील होणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे इतर पक्षाचे उमेदवार व शहरातील मतदार मात्र संभ्रमात असल्याचे दिसते आहे.