वैजापूर: पालिकेच्या पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ,ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पुस्तक वाचन
पालिकेच्या पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ,ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त,त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करीत वाचन प्रेरणा दिन निमित्त विद्यार्थ्यांनी बुधवार(ता.१५) रोजी तासभर पुस्तक वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.नीता राजेंद्र पाटील होत्या.तर प्रमुख पाहुणे माजी शिक्षणाधिकारी व जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत होते.