28 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास कविता अखंड राहणार जिजामाता नगर ह्या त्यांचे पती प्रकाश अखंड वय 51 वर्ष यांच्यासह भाऊबीज कार्यक्रमाकरिता गोंडखैरी येथे जात होते. दरम्यान त्यांच्याजवळ असलेले निर्माल्य शिरविण्यासाठी पोलीस ठाणे वाडी हद्दीतील आउटडोर हॉटेलच्या समोरील खदानीच्या पाण्यात प्रकाश उतरले असता त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. दरम्यान फायर ब्रिगेड व स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून मेयो हॉस्पिटल येथे नेला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.