वैजापूर: सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने वैजापूर पोलिस ठाण्यात मोठा जमाव
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने वैजापूर पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री मोठा जमाव जमा झाला होता. प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील या जमावाकडून करण्यात आली दरम्यान या प्रकरणात रात्री उशिरा वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.