ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत होरा पेट्रोल पंप समोर बुलेटच्या धडकेत प्रौढ गंभीर जखमी झाल्याची घटना दि.16 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता दरम्यान घडली फिर्यादी दीपक मुरलीधर दुर्गाणी वय 42 वर्ष राहणार हरिकाशी नगर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जखमी लक्ष्मण विरभान चावला वय 50 वर्ष राहणार कात्रानी लेआउट श्रीराम कॉलनी फुलचूटोला हे दुचाकी क्रमांक एम एच 35 यु 7011 मध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असताना समोरून आलेल्या बुलेट क्रमांक सीजी 04 एमएम 0962 च्या चालकाने भरधाव वेगात त्यांना जोरदार धडक दिली