जालना–बीड रोडवर अंबड पोलिसांची मोठी कारवाई; गुटखा वाहतूक उघडकीस अंबड पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत 73 लाख 8 हजार 250 रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व कंटेनर जप्त केला. ही कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या विशेष पथकाने व अंबड पोलिसांनी संयुक्तपणे केली. दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी जालना–बीड रोडवर संशयित वाहन MH 18 BZ 2350 थांबवून तपासणी केली असता विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. वाहन चालक शिवम जादो देशमुख (रा. मध्यप्रदे