यवतमाळ: वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी निधीला मान्यता; कामाला मिळणार चालना
यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी पाच कोटी ३४ लक्ष ५३ हजार रू. निधीला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, लवकरच कामाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात विविध पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.