नांदुरा: टाकळी वतपाळ गावकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलनाचा इशारा देताच तहसीलदारांनी लावली बैठक
टाकळी वतपाळ पुनर्वसित गावाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी अखेर सामूहिक जलसमाधी करण्याचा इशारा प्रशासनाला देताच प्रशासन जागे होऊन येत्या ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित केली केली आहे. या बैठकीत कार्यकारी अभियंता जिगाव धरण व पुनर्वस विभाग, शेगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा, पोलिस निरीक्षक नांदुरा, सरपंच टाकळी वतपाळ यांना बोलावण्यात आले आहे.यामधे नेमका काय मार्ग निघणार व सरपंच या सभेला उपस्थित राहतील का? याकडे लक्ष लागले.