माळशिरस: पुरंदावडे येथे पालखीच्या गर्दीत शेतकऱ्याचा तीन लाखाचा सोन्याचा गोफ पळवला, माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या एका शेतकऱ्याचा सोन्याचा गोफ अज्ञात चोरट्याने हिसकावल्याची घटना घडली आहे. रमेश आनंदराव कांडेकर (वय ५५, रा. आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. दि. १ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास कांडेकर हे आपल्या सहकाऱ्यांसह पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुरंदावडे (ता. माळशिरस) येथे गेले होते. गर्दीमध्ये दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील ३.३ तोळे वजनाचा गोप चोरीला गेला आहे.