शेतातून घरी परत जाणाऱ्या शेतकऱ्यावर रानगव्याने हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक शेतकरी जखमी झाल्याची घटना ४ जानेवारी रोजी गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव शेतशिवारात सकाळी घडली. निलकंठ नंदलाल तुरकर (५७) रा. सोनेगाव तालुका गोरेगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव तर सीताराम मयाराम पटले (६०) रा. सोनेगाव असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.निलाराम तुरकर हे नेहमीप्रमाणे सोनेगाव ते शहारवाणी दरम्यान असलेल्या त्यांच्या शेतात शेतीचे काम व जनावरां