उत्तर सोलापूर: मीरा हॉस्पिटल यतीमखाना येथे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ; चौघांवर गुन्हा दाखल
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २ ते ५ एप्रिल २०२४ दरम्यान मीरा हॉस्पिटल यतीमखाना येथे घडली.तब्बल पाच महिन्यानंतर ३ सप्टेंबर २०२४ रोजी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे (नेमणूक सलगर वस्ती पोलीस ठाणे सोलापूर शहर) यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.