शिरपूर शहादा रस्त्यावर अर्थे–वाघाडी दरम्यान आश्रम शाळेजवळ 11 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास दोन भरधाव दुचाकींचा समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दुचाकी वरील युवक पुन्हा दुसऱ्या दुचाकींवर फेकले गेल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून एका तरुणीला मुंबई येथे हलविण्यात आले. सदर अपघात हा रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे