राहुरी: शहरातील राजुभाऊ शेटे यांच्या कार्यालयास मंत्री शंभूराज देसाईंची भेट,आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांशी संवाद
पर्यटन तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई हे अहिल्यानगरहुन शिर्डीकडे जाताना राहुरी शहरातील शेतकरी विकास मंडळाचे नेते राजुभाऊ शेटे यांच्या संपर्क कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट देत दिली आहे. प्रसंगी राजूभाऊ शेटे,ता.प्रमुख देवेंद्र लांबे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला आहे. आज शनिवारी सायंकाळी शेटे यांच्या संपर्क कार्यालयास ना.देसाई यानी भेट देत आगामी होणा-या स्थानिक स्वराज्य निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे.