शिरपूर: शिरपूर फाट्यावर सलग दुसऱ्या दिवशी शोरूम फोडले,व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Shirpur, Dhule | Nov 9, 2025 शिरपूर फाट्यावर सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी धुमाकूळ घालत आणखी एक शोरूम फोडल्याची घटना 9 नोव्हेंबर 2025 सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.कालच चार शोरूम व एका घरात चोरी झाल्यानंतर आज पुन्हा एक शोरूम फोडल्याने एकाच परिसरात सलग दोन दिवसात 5 शोरूम व घरफोडी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. व्यापाऱ्यांनी पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी,अशी मागणी केली आहे.