लांजा: शहरातील मुथूट फायनान्स कंपनी शाखेत २६ लाख ८१ हजारांची फसवणूक, पाच जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
मुक्तच फायनान्स लिमिटेड च्या लांजा शाखेत २४ जून २०२४ ते५ मे २०२५ दरम्यान २६ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुथूट फायनान्स कंपनीच्या लांजा शाखेतील पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. असून त्यात शाखा व्यवस्थापकाचाही समावेश आहे. याप्रकरणी संजय चुडाजी राऊळ वय ४४ यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे कंपनीचे एक क्लस्टर मॅनेजर आहेत. तर संशयित लांजा शाखेचे कर्मचारी आहेत.