गोंदिया: प्राथमिक आरोग्य केंद्र,कुऱ्हाडी येथे विविध विषयावर जिल्हा परिषदेचे अर्ज बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत यांनी घेतला आढावा
प्राथमिक आरोग्य केंद्र, कुऱ्हाडी येथे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत यांनी भेट दिली. त्यादरम्यान तिथे विविध विषयावर आढावा घेण्यात आला आणि कर्मचारी व स्थानिक लोकांशी चर्चा करण्यात आली. औषध साठा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधा या संदर्भात आढावा घेतला याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर सभापती चित्रकला चौधरी यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.