दारव्हा: शहरातील बसस्थानक व यवतमाळ रोडवरील बियर शॉप वेळेत बंद न केल्याने कारवाई
दारव्हा शहरात परवानगीच्या वेळेपेक्षा जास्त वेळ बियर शॉप सुरू ठेवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी रात्री ११ वा.दारव्हा बसस्टँड समोरील नाना बियर शॉप तसेच यवतमाळ रोडवरील अशोक बियर शॉप येथे ही कारवाई करण्यात आली.