तळा: शेणवली येथे तळा येथील व्यापारी याची आत्महत्या - तळा पोलिस ठाण्यात नोंद
Tala, Raigad | Jan 4, 2025 तळा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.4) रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. किसन चौधरी (40) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून तळा बाजारपेठेत त्याचे ज्वेलर्स व नोव्हेल्टी चे दुकान आहे. शनिवारी किसन चौधरी हे आपल्या कामगारासोबत शेणवली येथील फार्महाऊस वर गेले होते. त्यांनी कामगाराला मी थोडा वेळ आराम करून येतो असे सांगून माघारी पाठवले. बऱ्याच वेळापासून मालक आले नाहीत, म्हणून पुन्हा कामगार शेणवली येथे पाहायला गेला असता त्याला मालक लोखंडी पाईप