पवनी: करचखेडा फाटा येथे अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई ! टिप्पर जप्त ; दोघांवर गुन्हा दाखल
करचखेडा फाटा येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व कारधा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 ते 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री दरम्यान पोलीस उपनिरीक्षक राजू मुरलीधर सोनपितरे (वय 36) हे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पथकासह अवैध रेती वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाले.