तालुक्याच्या बाक्टी येथील गणेश वातु चवरे (८४) यांच्या घरून १६ लिटर मोहफुलाची हात भट्टीची दारू जप्त केली. ही कारवाई २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आली. या कारवाईत १ हजार २०० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.