नांदेड: इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे स्थलांतर, संबंधितांनी नोंद घ्यावी : महामंडळाचे व्यवस्थापकाचे आवाहन
Nanded, Nanded | Nov 25, 2025 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत अ मध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यरत होते सदर कार्यालय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेच्या समोर इमारत ब मध्ये दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर करण्यात आलेले आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी आज सायंकाळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.