तुळजापूर: तुळजापूर लातूर महामार्गावर वडगाव लाख परिसरात मोटारसायकल चा अपघात , एकाचा मृत्यू.
तुळजापूर–लातूर महामार्गावर वडगाव लाख परिसरात राम अर्जुन कांबळे (वय 52) यांचा अपघातात मृत्यू झाला. मोटारसायकलची चैन तुटल्याने ते मदतीसाठी पायी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालक मदत न करता पसार झाला. याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.