गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील १७१ अनाथांना मिळाले प्रमाणपत्र
Gondiya, Gondia | Sep 21, 2025 कोरोनाने अनेकांचा मृत्यू झाला. काही कुटुंबांत तर आई-वडील अशा दोघांचा मृत्यू झाल्याने मुले पोरकी झाली. अनाथ झालेल्या १८ वर्ष वयोगटातील बालकांना शासनाने अनाथ प्रमाणपत्र दिले आहे. अवघ्या पाच वर्षांत १७१ बालकांना हे अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले असून त्या प्रमाणपत्राचा फायदा त्या बालकांना शिक्षणात व नोकरीच्यावेळी होणार आहे.