औंढा नागनाथ येथील गोकर्णेश्वर माळरानावर असलेल्या गोकर्णेश्वर महादेवाचे आषाढी एकादशीनिमित्त दिनांक सहा जुलै रविवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला होता. येथील गोकर्णेश्वराचे दर्शन घेतल्यास साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे हिंगोली, परभणी,नांदेड व ईतर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते गोकर्णेश्वर महादेवाचे मंदिर हे वन विभागाच्या उंच डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी असल्याने भविकात वाढ झाली