गोंदिया जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पदवीधर मतदार नोंदणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक सुशिक्षित मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी पदवीधर मतदार नोंदणीचे महत्त्व अधोरेखित करून आतापर्यंत झालेल्या पदवीधर मतदार नोंदणीचा आढावा यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख श्री. सुधाकरजी कोहळे, सहप्रमुख सुधीर दिवे, आदी उपस्थित होते.