महानायक बिरसा मुंडा चौक, लेंडेझरी येथे आयोजित भव्य ओपन एकदिवसीय प्रौढ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील क्रीडापटूंना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळत असून, युवकांमध्ये क्रीडासंस्कृती व शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होत आहे असे याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले म्हणाले.