सर्पदंशाने एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगरूळ दस्तगीर येथे घडली आहे .मंगरूळ दस्तगीर येथील रहिवासी सुनील मारोतराव तिजारे वय वर्ष 45 हे मंगरूळ दस्तगीर शिदोडी शेत शिवारात शेतामध्ये शेतीचे काम करत असताना एका विषारी सापाने त्याला दंश केला .तत्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे उपचार करिता आणले. उपचारानंतर पुढील उपचाराकरता अमरावती येथे पाठविण्यात आले. परंतु चांदूर नजीक मधातच रुग्नेवाहिकेत सुनील यांचा मृत्यू झाला. सुनीलच्या मृत्यूने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.