बार्शी: ५० प्रवाशांचा जीव वाचला! वैराग येथे एसटी नेली थेट डिव्हायडरवर
Barshi, Solapur | Sep 28, 2025 सोलापूर-बार्शी मार्गावरील एका एसटी बसचा फुलपुश रॉड तुटल्याने बस वैराग येथे डिव्हायडरवर चढली. आज सकाळी ११.४५ वाजता ही घटना अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ घडली. बसमध्ये तब्बल ४० ते ५० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला व कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वारंवार नादुरुस्त बस धावत असल्याने प्रवाशांनी एसटीच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गावरील सर्व बसेसची तपासणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.