शिरपूर: शहरात खालचे गाव परिसरात भरदिवसा घरफोडी;सोन्या-चांदीचे दागिने,लंपास शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
Shirpur, Dhule | Oct 13, 2025 शहरातील खालचे गाव परिसरात भरदिवसा घरफोडी करून अज्ञातांनी बंद घराच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 13 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर घरफोडीची घटना 9 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे अडीच तीन वाजेच्या सुमारास किसन आत्माराम चौधरी वय 42, रा.खालचे गाव, बालाजी मंदिराजवळ शिरपूर याच्या घरात घडली होती.