रोहा: मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले १६४.९१ कोटी
Roha, Raigad | Dec 20, 2025 मागील वर्षभरात मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून १६४.९१ कोटी रूपये दंड वसूल केला आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे. २०२४–२५ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आलेली दंडात्मक वसूल करूनआलेले १३८ कोटी होती तर चालू वर्षात १९ टक्केने वाढ झाली आहे. प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याच्या आपल्या वचनबद्धतेतून मध्य रेल्वेने आपल्या मार्गावर अनधिकृत व विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.