संगमनेर: संगमनेर शहरात भीषण आग – अर्जुन पवार यांचे घर जळून खाक! लाखोंचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
संगमनेर शहरात भीषण आग – अर्जुन पवार यांचे घर जळून खाक! लाखोंचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली संगमनेर │ प्रतिनिधी संगमनेर शहरातील अर्जुन रूपचंद पवार यांच्या घराला आज पहाटे सुमारास साडेपाच वाजता अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या असून अंदाजे लाखभर रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पवार कुटुंबाने दिली आहे. आगीची तीव्रता एवढी होती की काही क्षणांतच घरातील संपूर्ण वायरिंग, फर्निचर आणि कपडे आगीच्या विळख्यात सापडले.