बुलढाण्यातील नगराध्यक्ष पदाचे सर्वच उमेदवारांनी बोगस मतदानाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशी ची मागणी करावी असे मत ॲड.सतिशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले आहे.लोकशाही आणि बुलढाणेकरांचा अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी बुलढाणा नगरपरिषद परिसरातील स्ट्रॉंग रूम समोर पहारा आंदोलन 6 डिसेंबर ला रात्री साडेदहा वाजेपासून सुरू केले.बुलढाणा शहरातील 3000 च्या वरती झालेल्या बोगस मतदानाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी जेणेकरून जनसामान्यांच्या हक्काचं आणि लोकशाहीच संरक्षण संवर्धन होईल.