शहादा: खेडदिगर येथील नाकाबंदीच्या ठिकाणी ॲपे रिक्षातून म्हसावद पोलिसांनी 85 हजार 804 रुपयांचा विमल गुटखा केला जप्त
शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली. या तपासणीत रिक्षामध्ये विमल गुटखासाठा मिळून आला. शहादा तालुक्यातील विरपूर येथील आलमसिंग सोमा वळवी हा विमल गुटख्याची तस्करी करीत असल्याची माहिती म्हसावदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला सांगून सापळा रचला होता. पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली असता ८५ हजार ८०४ रुपयांचा गुटखासाठा व एक लाख २० हजार रुपयांची ॲपेरिक्षा जप्त केला आहे.