कुही: राम मंदिर मांढळ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांनी साधला महिलांशी संवाद
Kuhi, Nagpur | Oct 12, 2025 तालुक्यातील मध्यभागी असलेल्या राम मंदिर मांढळ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांनी महिलांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. याबाबत चे वृत्त असे की गावागावात अवैध धंद्या विरोधात जनजागृती घडवून आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी राम मंदिर मांढळ येथे महिलांशी संवाद साधून सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच सोनू निरगुडकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.