दिनांक 05 मार्च 2026 रोजी धापेवाडा – आदासा रोडवर दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती मिळताच समाजसेवक मंगेशभाऊ गमे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी स्वतःची अँम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी जाऊन जखमी नागरिकांना तातडीची मदत केली.जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी मंगेश भाऊ गमे यांनी स्वतः पुढाकार घेत जखमींना अँम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयात उपचारासाठी हलवले.