उमरखेड: रिपब्लिकन युवासेना सर्व ताकदिनिशी लढणार ; ठिकठिकाणी आढावा बैठकांचे आयोजन
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारव्हा येथे डॉ. बी. के. पंडित यांच्या वतीने आयोजित आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर तर जिल्हा संपर्कप्रमुख संतोष ठमके हे निवड प्रक्रिया प्रमुख म्हणून उपस्थित होते. तसेच दिग्रस तालुका अध्यक्ष नितीन धुळध्वज, तालुका सदस्य सिद्धते कांबळे व उमरखेड शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.