मिळालेल्या माहितीनुसार, दारूची वाहतूक करणारा आरोपी गोडाऊनमधून निघालेल्या वाइनच्या बॉक्समध्ये वाटेत थांबायचा.तो बॉक्सचे सील न तोडता विशिष्ट पद्धतीने उघडून त्यातील वाइनच्या बॉटल्समधून काही वाइन दुसऱ्या बिसलरीच्या बॉटलमध्ये काढून घ्यायचा.नंतर वाइन कमी झालेल्या बॉटल्समध्ये पाणी मिसळून तो बॉक्स पुन्हा तसाच सीलबंद करून दारूच्या दुकानात पोहोचवायचा.