साक्री: लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे;पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर सभा
Sakri, Dhule | Nov 24, 2025 लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, एकनाथ शिंदे जोपर्यंत आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत काही लोकांची मळमळ थांबत नाही, त्यांच्यासाठी आपण बाळासाहेब ठाकरे दवाखानाही सुरू केला आहे. मात्र, तेथेही त्यांना बरं वाटत नाही. त्यामुळे त्यांना तुम्ही जमाल गोटा दिला पाहिजे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणला.पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपळनेर येथे जाहीर सभा