अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी दिली आहे. मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व्हावी यासाठी स्ट्रॉंग रूम परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना थेट स्क्रीनवर लाईव्ह दृश्य पाहता येईल, अशी सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.